‘जुगाड’ : निमशहरी भागातल्या तरुणांचं शहरात आणि निमशहरात होणाऱ्या परवडीचं प्रातिनिधिक चित्र
तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला एकूणच समाजात आब आहे. पण त्यातही पदविका, पदवी, शाखा, कॉलेजचं नावाजलेपण, पुण्या-मुंबईतलं आणि पुण्या-मुंबईबाहेरचं शिक्षण, मोठ्या महाविद्यालयांचं आणि नोकरी देणाऱ्या संस्थांचं बड्या प्रस्थांशी असलेलं साटलोटं आणि त्यातून केलं जाणारं राजकारण, हे सगळे घटक तंत्रज्ञानात कुशल असणाऱ्या होतकरू तरुणाशी सतत कबड्डी खेळत राहतात आणि बहुतेकदा त्याचा पाय ओढून त्याला लोळवण्यात यशस्वी ठरतात.......